बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत डेट वर जाऊ इच्छिते आर्ची - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

NEWS

Breaking

Home Top Ad

LightBlog

Post Top Ad

LightBlog

Sunday, November 3, 2019

बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत डेट वर जाऊ इच्छिते आर्ची



मित्रानो सैराट चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल त्या चित्रपटात आर्चीची भूमिका निभावणारी रिंकू राजगुरू कोणाला माहित नाही. आर्ची पारश्याची जोडी एका रात्रीत इतकी फेमस झाली कि सातासमुद्रापार त्यांचं नाव झालं. या पहिल्याच मराठी चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला. रिंकू राजगुरू अनेकांची चाहती बनली मात्र याच रिंकूला देखील एक बॉलिवूडचा अभिनेता आवडतो. सैराट नंतर आकाश ठोसर ने “लस्ट स्टोरीज” या वेबसिरीज मध्ये राधिका आपटे सोबत काम केले होते.

याच वेब सिरीजमध्ये विकी कौशल ने देखील काम केले आहे. त्यानंतर उरी द सर्जिकल स्ट्राईक मध्ये देखील विकी कौशल ने काम केले आहे. रिंकू राजगुरू हि विकी कौशल सोबत डेट वर जाऊ इच्छिते असं तिने स्वतः सांगितलं आहे. रिंकू राजगुरूंला विकी कौशल खूप आवडतो असं देखील ती म्हणाली होती. रिंकू आणि आकाश चांगले मित्र आहेत. आकाश ने काम केलेल्या लस्ट स्टोरीज वेब सिरीज ला रिंकू ने पहिले असेल आणि त्यामध्येच तिने विकी ची भूमिका पहिल्या नंतर तिला कदाचित विकी कौशल आवडला असेल.
कलर्स मराठी वाहिनीवरील “एकदम कडक” या कार्यक्रमात रिंकूला म्हणजेच आर्चीला अनेक प्रश विचारले गेले होते. त्यामध्ये एक प्रश्न विचारला होता कि एक दिवस डेट वर कोणासोबत जाऊ इच्छिते त्यावेळी तिने विकी कौशलचे नाव घेतले होते. त्यानंतर विचारले कि विकी कौशल का तर ती म्हणाली कि मला विकी कौशल फार आवडतो. मित्रानो तुम्हाला आर्चीची हि आवड कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा. अनेकांना आर्चीची आवड पटत नसेल कारण आरची पारश्याची जोडी अनेकांना आवडते. मात्र आवड हि प्रत्येकाची आपापली असते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages