आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यावर अजित पवार म्हणतात … - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

NEWS

Breaking

Home Top Ad

LightBlog

Post Top Ad

LightBlog

Saturday, November 2, 2019

आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्यावर अजित पवार म्हणतात …


मुंबई :- महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी संघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आदित्य यांच्या मुख्यमंत्री होण्यावर महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री कुणाला करावा हा शिवसेना आणि भाजपचां निर्णय आहे. अनेकदा विधिमंडळाच्या सदस्य नसलेल्यांनाही मुख्यमंत्रिपद दिलं गेलं आहे,’ असं म्हणत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर उत्तर दिलं आहे.

राज्यात सत्तासंघर्ष सुरू असतानाच राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘राजकीय नेत्यांनी आणीबाणीच्या सारखं आततायी विधान करू नये. राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, आधी त्याला मदत करा,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

तसंच, राष्ट्रपती राजवटीची भाषा कोणी करत असेल तर तो प्रयत्न शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी होत असेल. पण असं काही होणार नाही. असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची उद्या बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि पिकांचं झालेलं नुकसान याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर आम्ही राज्यभर दौरा करणार आहोत,’असे अजित पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages