पत्नीचा हट्ट नाही सरला मागे , राहत्या घरात पतीने गळफास घेतला बीड - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

LightBlog

Post Top Ad

LightBlog

Friday, November 8, 2019

पत्नीचा हट्ट नाही सरला मागे , राहत्या घरात पतीने गळफास घेतला बीड
बीड शहरापासून काही किलोमीटर अंतरावर केज तालुका आहे. आणि याच शहरातील क्रांतीनगर भागामध्ये डोंगरे यांचे एक गरीब कुटुंब वास्तव्यास होतं. या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख किसन डोंगरे हे आपली पत्नी कमलाबाई समवेत गेली अनेक दिवसांपासून या भागात राहत होते. मात्र त्यांच्या नशिबी मोलमजुरी सह काबाड कष्टाची कामे आलेली होती. कारखान्यावर जाणे, ऊस तोडणे, अशी अनेक अवघड कामे करून ते आपला उदरनिर्वाह भागवत होते. पुढे काही दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला. काही कालांतराने त्यांना पाच मुले होती. त्यांची नावे रमेश, गणेश, गौतम, उत्तम, व आतम अशी होती. यामध्ये रमेश, गणेश, गौतम, या तिघांची लग्न झालेले होती. तर उत्तम याचे शिक्षण सुरू होते. व त्यांच्यात सर्वात लहान भाऊ म्हणजे आतम डोंगरे हा होता. उत्तम व आतम यांचे लग्न झालेले नव्हते. 
      क्रांती नगर भागात राहणाऱ्या डोंगरे कुटुंबातील लहान भाऊ आतम डोंगरे हा जरा गमतीचा होता. याच केज शहरातील गणेश नगर भागात माणिक गायके याचं कुटुंब वास्तव्यास होतं. त्यांना एक मुलगी होती. तिचे नाव दिपाली उर्फ राणी असे होते. क्रांतीनगर भागातील डोंगरे यांचे चिरंजीव आतम व गणेश नगर भागातील गायके यांची कन्या दिपाली उर्फ राणी या दोघांची ओळख झाली. पहिल्याच भेटीनंतर प्रेमात रूपांतर झाले. आणि दोघांचे सूत जुळले. वेळोवेळी दोघे एकमेकांना भेटू लागले. आणि एक नव्यानेच प्रेम कहानी सुरू झाली. दोघेही भिन्न प्रवर्गातील, आंतरजातीय होते. दिवसेंदिवस दोघांची जवळीक वाढत गेली. तब्बल दीड वर्षापासून ते दोघांच्याही घरच्यांना धूळ चारत यांचे हे प्रेम प्रकरण सुरू होते. काही दिवसात ते एवढे एकमेकांच्या जवळीक आले होते की, ते आता जास्त दिवस एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते. तेव्हा दोघे एक दिवस एकत्र आले. आणि दोघांनी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तेव्हा गेल्या वर्षी त्यांनी विजयादशमी हा दशहरा चा सन होऊ दिला. त्यानंतर त्यांनी कशाचा ही विलंब न करता, दोघांच्याही आई-वडिलांसह नातेवाईकांना न कळवता, मोठ्या धाडसीपणाने लव मॅरेज पद्धतीचे लग्न केले. आणि सर्वांना हादरून टाकले. इकडे डोंगरे कुटुंबात अजून एक मोठा भाऊ लग्नाचा राहिला असतानाही, या मुलाने असे कृत्य केल्याने आई वडिलांच्या मनाला मोठा त्रास झालेला होता. तर इकडे गायके यांच्या कन्येने न सांगताच कठीण पाऊल उचलून लग्न केल्याने, आई-वडिलांच्या काळजाला ही मोठा धक्का लागलेला होता.
     आतम आणि राणी या दोघांनी प्रेम प्रकरणानंतर मोठ्या धाडशी पद्धतीने प्रेम विवाह केला. मात्र ही रोजंदारी मोलमजुरी करणाऱ्या घरातील मुले असल्याने, त्यांच्याकडे कुटुंब चालवण्यासाठी मुबलक पैसा कोठून येणार. दुर्दैवाने यांनाही मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी त्यांच्या नशिबी ही मोलमजुरी आलेली होती. तेव्हा एका कारखान्यावरील मुकादमाकडून त्या दोघांनी उचल घेतली. ऊसतोडणीसाठी ते कामाला कारखान्यावर पती-पत्नी गेले. आणि ऊस तोडणीचे काम पूर्ण करून पुन्हा गावावर परतले. दोघांचे लव मॅरेज झाले असल्याने, त्यांना राहण्यासाठी घर, खर्चण्यासाठी पैसा, अशा अनेक गोष्टींची गरज भासत होती. अशावेळी गावावर आल्यानंतर त्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा गणेशनगर भागातील राणीच्या आईने म्हणजे तोळा बाईने लेकीच्या प्रेमाखातीर, या दोघांना तिने गणेश नगर भागातच एक खोली किरायाने करून दिली. ती खोली राजाभाऊ गायकवाड यांच्या मालकीची होती. हे दोघेही पती-पत्नी या खोलीत राहून आपलं दैनंदिन जीवन जगत होते. प्रेमविवाह केल्यानंतर सुरुवातीला त्यांच्या पती-पत्नीचे जीवन हे शांततेत सुरू होते. सकाळी उठल्यानंतर हे पती-पत्नी आपापल्या कामाला निघून जायचे. आणि पुन्हा वापस यायचे. आतम डोंगरे  हा  मिस्तरी सोबत बिगारी म्हणून कामाला जायचा. तर त्याची पत्नी राणी आपली आई तोळा बाई हिच्यासोबत मोलमजुरीसाठी कामाला जात होती. असा त्यांचा दिनक्रम सुरू असायचा. त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे दिवस हे आनंदात गेले.
    काही कालांतराने गणेश नगर भागात राणीच्या आईने गायकवाड यांची खोली किरायाने करून दिलेली,नंतर त्या पती-पत्नीने सोडून दिली. त्यानंतर याच भागातील भैया उर्फ सुदर्शन दौंड याच्या मालकीची खोली नुकतीच चार महिन्यापूर्वी या पती-पत्नीने किरायाने घेतली होती. त्यामध्ये ते राहत होते. तेव्हा रूम मालक भैया उर्फ सुदर्शन दौंड आणि आतमचा  पत्नीसह परिवार हा शेजारीच राहत असल्याने, व पुन्हा रूम मालक असल्याने त्यांच्याशी चांगलीच पत्नी राणीचीओळख निर्माण झाली होती. तेव्हा राणी व भैया दौंड या दोघांचे येता-जाता बोलणे चालणे सुरू असायचे. दिवसेंदिवस त्यांची बोलणे व त्यातून मिळणारा एकमेकांना प्रतिसाद, वाढतच गेला. पुढे काही कालांतराने भैया दौंड याच्याकडे त्याचा मित्र किरण बियांनी हा डोकावू लागला.आणि त्याच्यासोबत वेळोवेळी येऊ लागला. आणि त्याचेही बोलणे राणीशी होऊ लागले. दिवसेंदिवस या दोघा मित्रांचे आतम ची पत्नी राणी हिच्यासोबत बोलणे वाढतच गेले. आतम बाहेर गेल्यानंतर हे दोघे मुद्दाम त्याच्या दारात प्रवेश करायचे. आणि मुद्दाम त्याच्या पत्नीशी घरी जाऊन बोलत बसायचे. गप्पा मारायचे. आणि त्याची पत्नी ही त्यांच्या संवादाला प्रतिसाद द्यायची. आपल्या पत्नीशी या दोन व्यक्तींचा संवाद सुरू असल्याने, आतम डोंगरे याच्या मनात खटकले. यावेळी त्याने स्वतः समजदारी च्या भाषेत पत्नी दीपाली उर्फ राणीला व त्या रूम मालक भैया दौंड याला आणि त्याचा मित्र किरण बियांनी या दोघांनाही बजावून सांगितले की, तुम्ही माझ्या पत्नीशी संवाद का साधता? यापुढे माझ्या पत्नीशी अजिबात तुम्ही संवाद साधू नका! असे त्याने बजावले होते. मात्र या दोघांनी तिच्याशी संवाद साधने बंद केलेच नाही. दिवसेंदिवस यांचा संवाद साधण्याचा प्रकार वाढतच गेला. तिचा पती आतम हा घराबाहेर गेल्याचं पाहिलं की, हे मुद्दाम त्याच्या घरी जाऊन बसायचे. आणि  तिच्या सोबत गप्पा  मारायचे. या दोघांना व माझ्या पत्नीला मी सांगूनही हे एकमेकांशी घरी अथवा रस्त्यावर संवाद का साधतात? त्यांना मी सांगूनही का फरक पडत नाही. हे तिघे एकमेकांना का प्रतिसाद देत असतात. बोलतानाही ते दोघे तिचीच बाजू घेऊन मलाच का विरोध करतात? यावरून नक्कीच या दोघांचे आपल्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध सुरू असावे. आशा संशयाने त्याच्या मनात घर केलं. व दिवसेंदिवस त्याचा संशय वाढत गेला. वेळोवेळी त्यांच्यात भांडणे सुरू झाली. तरी हे दोघे त्या पती पत्नीच्या संसारात काहीच संबंध नसतानाही त्यांच्या वादात सामील व्हायांचे.आणि राणीचीच बाजू घेऊन पती लाच भांडायचे. वेळोवेळी त्यांच्या पती-पत्नीच्या  संवादाचा कानोसा घ्यायचे आणि मुद्दाम त्यांच्या संवादात सामील व्हायचे. यामुळे आपल्या पत्नी विषयी त्याला अनैतिक संबंधाचा संशय यायचा. यांच्याशी बोलणे बंद कर. असे म्हणत त्याने तिला बजावून सांगितले. मात्र तरीही तिच्यात कसल्याच प्रकारचा फरक पडलेला नव्हता. उलट ते एकमेकांशी बोलल्याशिवाय राहतच नव्हते. इतर पुरुषांचे आपल्या पत्नीबरोबर विरोध करूनही बोलण्याचे प्रमाण वाढणे, असे दिसून आल्यानंतर, कोणत्याही पतीच्या तळपायाची आग मस्तकाला गेल्या शिवाय राहनार नाही. याच पद्धतीने त्याची अवस्था झाली. त्याला भयंकर राग आला. आणि त्याचा पुन्हा पत्नीशी वाद झाला. याच कारणावरून दोघांचे एकमेकात खटके उडू लागले. दुसऱ्याच्या बोलण्याने त्यांच्या पती-पत्नीत वाद निर्माण झाला. त्यांचा हा वाद एवढा विकोपाला गेला की, यानंतर वेळोवेळी त्यांचे खटके उडू लागले. पती-पत्नी एकमेकांवर धावून जाऊ लागले. घरातल्या वस्तू एकमेकांना फेकून मारू लागले. शेवटी हतबल होऊन आतमला  त्या मुलीशी प्रेम विवाह केल्याचा संताप येऊ लागला. त्या पत्नी राणीपेक्षा त्याला आता आपलं जुनं कुटुंब आई-वडील भाऊ हेच जवळीक वाटू लागले. व तो आता हिच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांचा आश्रय घेऊ पहात होता. आणि पत्नी विषयक गाऱ्हाणे आई वडिलांच्या घरी येऊन त्यांच्या समोर मांडू लागला
   दिनांक 5 सप्टेंबर रोजी चा दिवस उजाडला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पुन्हा पती-पत्नीत वाद झाला. त्याच्या पत्नीला भैया उर्फ सुदर्शन दौंड व त्याचा मित्र बियाणी या दोघांनी पत्नी राणीला शिवी दिल्याची गोष्ट त्याच्या कानावर पडली. तेव्हा त्याने मित्र किरण मुजमुले यास सोबत घेऊन दौंड याच्याकडे गेले. त्याच्याकडे जाऊनम्हणाला की, बियाणी आणि तुम्ही दोघांनी मिळून माझ्या पत्नीला शिवी का दिली? अशी विचारणा केली. तेव्हा तो त्याच्या धुंदीतच होता. तेव्हा दोघात वादावादी  झाल्या.दोघेही मित्रपणाची भावणीकता दाखवू लागले. नंतर आतम हा सुदर्शन दौंड यास म्हणाला चल मी तुला आज दारू पाजतो. असे म्हणताच मुजमुले, सुदर्शन व आतम एका गाडीवर बसले. आणि दारू पिण्यासाठी केज शहरातील स्वागत बियर बार वर गेले. तेथे त्यांनी ऑर्डर दिली. तिघेही दारू पिले.पिल्यानंतर पुन्हा त्यांनी पत्नीला शिवी दिल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा आतम पुन्हा सुदर्शन ला म्हणू लागला की, तुम्ही दोघाणी माझ्या पत्नीला शिवी का दिली? असे म्हणत वाद घालू लागला. स्वागत बियर बार मध्ये त्यांचा हा वाद वाढत गेला. बोलण्यातून वादाने वाद पेटत राहिला. तेवढ्यात आतम याने समोर असणारा काचेचा ग्लास उचलला. आणि दारूच्या नशेत मोठ्या ताकदीने सुदर्शन च्या डोक्यात मारला. तेवढ्यात त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. त्यामुळे त्याला पट्टी करण्यासाठी मित्र मुजमुले याने तात्काळ सुदर्शन ला घेऊन डॉक्टर साखरे यांचा दवाखाना गाठला. त्यानंतर त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. आणि पुन्हा बारवर असणाऱ्या आतम ला आणण्यासाठी परत गेला. तोपर्यंत आतम रस्त्याने पायी चालत येत होता. तेव्हा त्याला मुजमुले याने रस्त्यावरून गाडीवर बसवले. आणि गावातील वसंत शाळेच्या कमानीजवळ आणून सोडले. संध्याकाळी घरी परतल्यानंतर पुन्हा पती-पत्नीत संशयावरून वाद झाले. त्या बियानी आणि दौंड दोघांनीही आतम याला संशय घेतल्याच्या कारणावरून धमकी दिली होती. एका बाजूला पत्नी राणी, भैय्या दौंड व बिर्याणी हे तिघे एका बाजूला तर, दुसऱ्या बाजूने आतम डोंगरे हा एकटाच असायचा. यावरून आपली पत्नी आपल्याला भांडते. आपल्याविरोधात चालते.नको म्हटले तरी इतरांशी संवाद साधते. इतरांच्या संवादाला प्रतिसाद देते. माझ्यावर हाणामारीला धावून येते. अशा अनेक प्रश्नांनी त्याच्या डोक्यात संशयाने घर केले. आणि मानसिक तणावात येऊन त्याने राहत्या घरामध्ये साडीने गळफास घेतला. तेव्हा पत्नीने पाहताच तात्काळ त्याची फाशी सोडली. आणि त्याला खाली घेतले. तोपर्यंत आतम डोंगरे हा मयत झालेला होता.
     दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 05:51 मिनिटाने आतमचा भाऊ उत्तम यांच्या फोनवर पत्नी दीपाली उर्फ राणी हिने फोन केला. आणि घाबरलेल्या अवस्थेत म्हणाले की, आतमने घरी फाशी घेतली आहे. तुम्ही लवकर या. त्यानंतर आतमचा  भाऊ उत्तम याने तात्काळ घरातील सर्व सदस्यांना घडलेली घटना कळवली. तेव्हा आई वडील व भाऊ या सर्वांनी गणेश नगर भागात असणाऱ्या त्यांच्या घराकडे धाव घेतली. आणि जाऊन पाहतात तर, त्याच्या घराचे दोन्ही सेटर लावलेले होते. त्यांच्या भावातील एक भाऊ गौतम याने लहान सेटरचा बाहेरील खटका उघडुन आत मध्ये प्रवेश केला.त्यानंतर सर्वांनी आत प्रवेश केला. जाऊन पाहतात तर त्यांना आतमचा मृतदेह मयत अवस्थेत अंथरुणावर पडलेला दिसून आला. त्याच्या गळ्यावर जखमा झालेल्या होत्या.
    गणेश नगर भागात आतम डोंगरे याने राहत्या घरात फाशी घेतल्याची माहिती वाऱ्याप्रमाणे मोठ्या वेगात जिल्हाभर पसरली तात्काळ या घटनेची माहिती काही नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात कळवली. गणेश नगर भागात आत्महत्येची माहिती मिळताच, तात्काळ विभागीय पोलीस उपाधीक्षक अशोक आमले, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्यासह कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. पती आतम डोंगरे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी दीपाली उर्फ राणी व त्यांचा रूम मालक सुदर्शन उर्फ भैय्या अंकुश दौंड, किरण बियांनी यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 373/ 2019 नुसार कलम 306, 323, 506, 34 भा द वि सहकलम 3 (1) (आर) 3 (2)(5) अ  जा ज अ प्र कायदा सन 1989 सुधारणा अन्वय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. इकडे डोंगरे यांचे नातेवाईक मोठा आक्रोश करत होते. आमच्या मुलाने आत्महत्या केलेली नसून, त्याचा या तिघांनी मिळून खून केलेला आहे. म्हणून यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाइकांनी लावून धरली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक आमले यांनी नातेवाईकांना विश्वासात घेतले. आणि त्यांची समजूत काढली.तात्काळ तिन्ही आरोपीस अटक करण्याचे नातेवाईकांना आश्वासन दिले. घटना घडल्यापासून हे तीनही आरोपी फरार झालेले होते. त्यानंतर विभागीय पोलिस उपाधीक्षक अशोक आमले यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तेव्हा पत्नी दीपाली उर्फ राणी आपल्या आई वडिलांच्या घरी त्यांचा सहारा घेऊन दडून बसली होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्याच्या घरी जाऊन तिला ताब्यात घेतले. आणि जेरबंद केले. तसेच भैय्या उर्फ सुदर्शन दौंड याला राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. दोघांना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर, त्यांचा मित्र किरण बियाणी मोठा घाबरला होता. आता आपल्यालाही पोलीस सोडणार नाहीत. याच्या भीतीपोटी बियाणी सैरावैरा धावू लागला. घाबरलेल्या अवस्थेत तो शेतात जाऊन लपला. बियाणी शेतात लपून बसल्याची माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी शेतात जाऊन सापळा रचला. व त्यास ताब्यात घेतले. व त्याच्या मुसक्या आवळून त्यास जेरबंद केले.  आतमच्या हासत्या खेळत्या संसारात संवादाच्या माध्यमातून डोकावून, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह दोघे मित्र अशा तिघांनाही जेलची हवा खावी लागली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog
loading...