२५० जणांविरोधात कारवाई - माजलगाव तालुक्यात वीजचोरी करणाऱ्यावर - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

LightBlog

Post Top Ad

LightBlog

Friday, November 8, 2019

२५० जणांविरोधात कारवाई - माजलगाव तालुक्यात वीजचोरी करणाऱ्यावर
माजलगाव : वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात कारवाई केली. तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तीन ठिकाणी धाड टाकून वीजचोरी करणाऱ्या जवळपास 250जणा विरोधात कारवाई केली आहे. माजलगांव शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. त्याच बरोबर शहरात आणि तालुक्यात हजारो व्यवसाय आहेत. मात्र शहरात 6k हजार 500 तर तालुक्यात 10k हजार 500 ग्राहक आहेत. यामुळे तालुक्यात वीजचोरी मोठयाप्रमाणात होत असल्याचे उघडकीस आले. यावर काही कारवाई होत नसल्याने काही नागरिक बिनधास्तपणे आकडे टाकून वीजचोरी व मिटरमध्ये छेडछाड करत असत. यामुळे तालुक्यात वीजगळतीचे प्रमाण 50 टक्यापर्यंत पोहचले आहे यातच तालुक्यात वीजबीलाची थकीत
बाकी 9 कोटी 50 लाख रुपये आहे.
महावितरणच्या पथकाने गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये धाड टाकली. या ठिकाणी आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 250 जणांवर कारवाई करण्यात आली. पथकांमध्ये उप विभागीय अभियंता सुहास मिसाळ यांच्यासह, कनिष्ठ अभियंता चेतन चोधरी, मयूर अमरे, प्रताप इंगळे सहायक अभियंता व जवळपास 40 होते. वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करणार असल्याचे उपकार्यकरी अधिकारी सुहास मिसळ यांनी सांगितले. तसेच वीजचोरांविरोधात ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे.
No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog
loading...