परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली. - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

LightBlog

Post Top Ad

LightBlog

Thursday, November 7, 2019

परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली.

बीड : परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली. या अपघातात बैलगाडीचे मोठे नुकसान झाले. यात बसमधील कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. ही घटना बीड-पाटोदा रस्त्यावरील लिंबागणेश नजीक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. माहिती मिळताच एस.टी.महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.

राज्य परिवहन महामंडळाने करार तत्वावर शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यभरात सुरु केलेल्या आहेत. मात्र, प्रवास करताना अनेकदा या बस बंद पडण्याचे प्रकार घडलेले आहेत. असे असतानाच गुरुवारी लिंबागणेशजवळ शिवशाही बसचे टायर फुटले. परळी येथून पुण्याकडे निघालेली बस (MH.14/2460) ही मांजरसुंब्याहून पुढे लिंबागणेशकडे धावत असतांना अचानक बसचे समोरील टायर फुटले. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.
सध्या मांजरसुंबा ते पाटोदा या चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. बस बाजूला घेतांना रस्त्यालगत उभ्या बैलगाडीवर जावून ती आदळली. यात बैलगाडी अक्षरश: खिळखिळी झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. सुदैवाने यात बसमधील एकही प्रवाशी जखमी झाला नाही. इतर बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसवून देण्यात आले.


आपल्या गावामधील बातम्या दया ILOVEBEED वर
वेबसाइट वर जउन Submit बटनावर क्लिक करुण पठावा अन्यथा ईमेल पठावा
Ilovebeed2019@gmail.com वरवाचा

नवजात शिशु को उल्टी होना का कारण क्या हैं ?

गर्भधारण कैसे होता है ?

प्रेगनेंसी में बाईं तरफ सोना नहीं है जरूरी


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog
loading...