अनुभवू या मीडियाचं जग! - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Thursday, December 5, 2019

अनुभवू या मीडियाचं जग!करिअरपासून मनोरंजनापर्यंतचे विविध रंग मीडियाच्या माध्यमातून अनुभवत असतो. तेच अनुभवण्याची संधी रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये येत्या ६-७ डिसेंबरला मिळणार आहे. कॉलेजच्या बीएमएम विभागातर्फे 'मीडिओसा' या दोन दिवसीय फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या फेस्टचं चौथं वर्ष असून 'थ्री नॉस्टॅल्जिक डीकेड्स ऑफ बॉलीवूड (१९९०-२०१९)' ही थीम ठेवण्यात आली आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या फेस्टचा मीडिया पार्टनर आहे. यंदा या फेस्टमध्ये फोटोग्राफी, रॅपिंग, नृत्य, मार्केटिंग, क्विज आणि न्यूज रिपोर्टिंग अशा काही धमाकेदार इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे.

रिपोर्टिंगचा प्रत्यक्ष अनुभव
पत्रकारितेत येऊ इच्छिणारे आणि मीडियामध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 'न्यूज रेपोर्टिंग' हा इव्हेंट त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.

शिकू या नव्यानं सारं
फेस्टमधील विविध स्पर्धाचं परीक्षण गणेश वानारे (फोटोग्राफर), हर्षला पाटील (युट्यूबर), श्रद्धा गायकवाड (मिस ठाणे- २०१६), सुकन्या कालन (डान्सर), स्लेज गली गँग (रॅपर), रोहित गायकवाड (अध्यक्ष- अभिनय कलाकेंद्र) आणि अमितराज (संगीत दिग्दर्शक) हे करणार आहेत. परीक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनातून स्पर्धकांना अनेक गोष्टी नव्यानं शिकता येतील.
'मिस्टर अँड मिसेस मीडिओसा' या इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील टॅलेंटला वाव मिळेल. त्याच सोबत व्यक्तिमतत्त्वातील विविध पैलूंना आकार मिळेल हे नक्की! 'हस्ते रेहेना रे बाबा', 'मीडिओसा दंगल' अशा काही मजेशीर इव्हेंटचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. मीडियाचे हे अनोखे रंग अनुभवण्यासाठी फेस्टिव्हलला नक्की हजेरी लावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog