Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीड शहरात दगडफेक पोलिस व्हॅन सह चार बस फोडल्या, जमाव हिंसक पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दारांचे शांततेचे अवाहनबीड :- नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी तिव्र स्वरुपाचे आंदोलन सुरु आहे. आज बीड बंद होते. दुपारी दोन नंतर जमाव मोठ्या प्रमाणात बशिरंगज भागामध्ये जमा झाला होता. यावेळी काहिंनी दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली होती. जामावाने ४ बस फोडल्या. तर पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. सध्या शहरात शांततेचे वातावरण आहे. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह अप्पर अधिक्षक विजय कबाडे यांनी काही ठिकाणी भेटी देवून शहरवाशियांना शांततेचे अवाहन केले आहे.

हिवाळ्यात फिरायला जाताय का ?


आज बीड जिल्हा बंद होता या बंधमध्ये शहरातील सर्व व्यापार्‍यांनी सहभाग नोंदवला होता. दुपारी दोनच्या नंतर बशिरगंज राजूरीवेसह अन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. जमावातील काही तरुणांनी दगडफेक केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दगडफेक करणार्‍या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये चार बस ही फोडण्यात आल्या. जालना रोड, बशिरगंज, भाजीमंडई, राजूरीवेश, पोलिस अधिक्षक कार्यालय या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून सध्या शहरामध्ये शांतता आहे. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलिस अधिक्षक कबाडे यांनी अनेक ठिकाणी भेटी देवून जनतेला शांततेचे आवाहन केले.
आधी प्रेमसंबंध नंतर ब्लॅकमेलिंग, बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या (रिपोर्टर)