बिग बींसाठी लिहिलं पत्र अभिषेकने - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, December 30, 2019

बिग बींसाठी लिहिलं पत्र अभिषेकनेमुंबई- रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते बॉलिवूडचे शहेनशहा यांना देण्यात आला. ७७ वर्षीय अमिताभ यांच्यासोबत यावेळी जया बच्चन आणि अभिषेक बच्चनही उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यानंतर अभिषेकने सोशल मीडियावर वडिलांसाठी एक खास मेसेज दिला. अभिषेकने इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, 'माझे प्रेरणास्त्रोत, माझा हिरो. दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी तुमचं अभिनंदन. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे. लव्ह यू.' तब्येत बिघडल्यामुळे अमिताभ बच्चन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. स्वतः बिग बी यांनी त्यांच्या तब्येतीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. यानंतर माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २९ डिसेंबरला अमिताभ बच्चन यांचा गौरव करण्यात येईल अशी माहिती दिली होती. बिग बी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ते 'गुलाबो सिताबो', 'चेहरे', 'झुंड' आणि 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.Post Bottom Ad

LightBlog
loading...