मून येतोय सून - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Wednesday, December 4, 2019

मून येतोय सून

टेकफेस्टमध्ये वादविवाद आणि चर्चासत्र

प्रथमेश गायकवाड, विल्सन कॉलेज

नाविन्यपूर्ण कल्पना, डोळे दीपवणारं तंत्रज्ञान आणि हट के इव्हेंट्स यांचं माहेरघर असणाऱ्या आयआयटी मुंबईचा 'टेकफेस्ट २०२०' लवकरच टेकनोप्रेमींच्या भेटीला येणार आहे. तंत्रज्ञानाची पंढरी समजला जाणारा हा फेस्टिव्हल यंदा ३ ते ५ जानेवारी दरम्यान आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये रंगणार आहे. यंदा या फेस्टिव्हलची एका विशेष कारणासाठी जागतिक स्तरावर चर्चा होत आहे. 'टीडब्ल्यू-मून' म्हणजे 'टेकफेस्ट वर्ल्ड मॉडेल युनायटेड नेशन' (TWMUN) यातील आंतराष्ट्रीय विषयांचा परिपाक असणाऱ्या वादविवाद आणि चर्चात्मक स्पर्धा हे या चर्चांचं मुख्य कारण आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे.

टेकफेस्टच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असणाऱ्या 'टीडब्ल्यू-मून' या स्पर्धेचं स्वरूप संयुक्त राष्ट्र संघामधील (युनायटेड नेशन्समधील) विविध बारा समित्यांवर आधारित आहे. टेकफेस्टमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक समित्यांचा समावेश असेल. प्रत्येक समितीत दोन ते तीन विषय हाताळले जाणार आहेत तर प्रत्येकी एका विषयावर वादविवादात्मक आणि चर्चात्मक सत्र आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पसंतीनुसार आणि अनुभवानुसार प्रत्येकी एक देश आणि समिती दिली जाईल. प्रत्येक समितीत चाळीस देश असून स्पर्धकांना त्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे. जागतिक विषयांशी निगडित असणाऱ्या या टेकफेस्टमधील स्पर्धेचं हे पाचवं वर्ष असून प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध समित्यांचं काम कसं चालतं, कशाप्रकारे चर्चा करून निष्कर्ष काढला जातो, हे अनुभवण्याची सुवर्णसंधी टेकफेस्टच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना https://techfest.org/mun या लिंकवर जाऊन नावनोंदणी करता येईल.

सामाजिक भानाची त्रिसूत्री

मूनमध्ये एकूण बारा समित्या असणार आहेत. त्यापैकी तीन समित्यांचे विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीवरील उपाय, स्त्रियांचे हक्क, विकसित आणि विकसनशील देशातील सुदृढ व कुपोषित मुलं या विषयांवर वादविवादात्मक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फेस्टमधील हे तीन सामाजिक विषय म्हणजे सामाजिक भानाची त्रिसूत्रीच म्हणावी लागेल.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog