आकाश मुद्रा - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Tuesday, December 3, 2019

आकाश मुद्रा

डॉ. सुरक्षित गोस्वामी, योगगुरु कान हा मनुष्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अवयव. नीट ऐकू आलं नाही, तर काम कसं होणार? बहिरेपणाची समस्या अनेकांना असते. फक्त बहिरेपणाच नव्हे, तर कानामध्ये आवाज येणं हेदेखील काही जणांना जाणवत असतं. पण, त्यासाठी लोक पटकन डॉक्टरकडे जात नाहीत. कानाच्या या समस्या दूर करण्यामध्ये सहाय्यक ठरू शकते. कारण शब्द हे आकाश तत्त्वापासून बनलेले आहेत. त्यामुळेच कानाच्या विकारांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. त्याबरोबरच हाडं कमकुवत झाली असतील तर त्यातही या मुद्रेमुळे लाभ होतो. कसं कराल? कोणत्याही आरामदायक आसनात बसा. कंबर आणि मान सरळ ठेवा. दोन्ही हातांची मधली बोटं वाकवून त्यांचा पुढचा भाग अंगठ्याच्या सुरुवातीच्या भागावर लावून थोडा दाब द्या. यावेळी इतर तीन बोटं सरळच राहतील. हात गुडघ्यावर ठेवा. इथे हाताच्या तळव्यांची दिशा वरच्या बाजूला राहिल. तळवे घट्ट आणि मनगटाच्या वर खांद्यापर्यंत हात सैलसर राहिल. १० ते १५ मिनिटं या मुद्रेत राहा. काही दिवसांनंतर याचा फायदा दिसून येऊ लागेल. सुरुवातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास उत्तम.


from Lifestyle News in Marathi: Lifestyle Online News in Marathi, Fashion News | Maharashtra Times https://ift.tt/2RfSnYA
via Lifestyle

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog