जोड्या तुमच्या भेटीला - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Tuesday, December 3, 2019

जोड्या तुमच्या भेटीला

विजया चव्हाण, एस. के‌. सोमय्या कॉलेज
'शोले'मधली जय-वीरुची जोडी असेल, 'लगे रहो...'मधली मुन्नाभाई-सर्किटची जोडी असेल किंवा वेब सीरिजमधली गायतोंडे-बंटी ही जोडी असेल...अशा अनेक जोड्या तुफान लोकप्रिय आहेत. या चर्चेतल्या जोड्यांवरुन एक भन्नाट थीम घेऊन एस. के. सोमय्या कॉलेजच्या बीएमएम विभागाचा 'मीडियाथेक' हा फेस्टिव्हल कॉलेजिअन्सच्या भेटीला येतोय. येत्या ९ आणि १० डिसेंबरदरम्यान हा फेस्टिव्हल साजरा होणार आहे. फेस्टचं हे पाचवं वर्ष असून, 'महाराष्ट्र टाइम्स' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे.


प्रेक्षकांसाठी आयकॉनिक ठरलेल्या ड्यूओजवर आधारित 'असेन्शन ऑफ ड्युएटिनोज्' अशी थीम या फेस्टिव्हलसाठी घेण्यात आली आहे. फेस्टिव्हलची जोरदार तयारी सध्या कॅम्पसमध्ये सुरू आहे. फेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या आवडत्या जोड्या स्पर्धक म्हणून एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. यामध्ये हिंदी सिनेमातल्या लैला-मजनू, कबीर-शिवा, दया-अभिजीत, जय-वीरू अशा जोड्यांचा तसंच हिंदी आणि इंग्रजी वेब सीरिजमधल्या सुप्रसिद्ध जोड्यांचा समावेश करण्यात आला आहे. इतर कॉलेजमधील विद्यार्थीही या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. फेस्टचं मुख्य आकर्षण असलेल्या ड्यूओज या थीमवर आधारित एकूण १८ इव्हेंट्समध्ये विद्यार्थ्यांना आपली कल्पकता दाखवण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये लिटररी, आर्टिस्टिक, स्पोर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स या विभागाअंतर्गत स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टमध्ये नृत्य, नाटक, फॅशन शो, फोटोग्राफी, बँड हे इव्हेंट्स कॉलेजिअन्साठी मुख्य आकर्षण असणार आहेत.

लिटररी इव्हेंट्स
'वीव्ह अ टेल', 'बॅरल्स ऑफ लाफ' अशा इव्हेंट्सचा यंदा 'मीडियाथेक'मध्ये समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कल्पनाशक्तीचा वापर करून मनोरंजक कथा लिहिण्याची संधी मिळणार आहे.

आर्टिस्टिक इव्हेंट्स
'शटर अप' या इव्हेंटमध्ये फोटोग्राफी, 'इलस्ट्रेटेड कारनामा' इव्हेंटमध्ये ग्राफिक डिझायनिंग, 'डेनिम इट युवरसेल्फ' इव्हेंटमध्ये डेनिम कपड्यापासून नवीन डिझायनर लूक तयार करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल.

स्पोर्ट्स इव्हेंट्स
'फेसिंग द जायंट्स' हा फुटबॉल इव्हेंट तसंच 'एव्हरी मिनिट् काउंट्स'मध्ये विद्यार्थ्यांना फुटबॉलचं समालोचन करण्याची संधी मिळणार आहे.

परफॉर्मिंग आर्ट्स
'ट्रिब्युट ट्रेड'मध्ये फॅशन शो, 'टू मच ड्रामा'मध्ये नाट्यविषयक इव्हेंट , 'बार्स अँड बीट्स'मध्ये बीटबॉक्सिंग, 'कॉमिक कौन?'मध्ये स्टँडअप कॉमेडी तसंच डान्स, बँड, डबिंग आणि रेडिओ जॉकी यासारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना आपल्यामधले कलागुण दाखवण्याची संधी मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog