मन:स्वास्थ्य जपण्यासाठी धावाधाव - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, December 6, 2019

मन:स्वास्थ्य जपण्यासाठी धावाधाव

आनंदी आयुष्यासाठी शरीर आणि मन दोन्ही निरोगी असणं गरजेचं आहे. तसंच शारीरिक स्वास्थ्य जर उत्तम असेल तर मानसिक आजार बळावत नाही. हाच संदेश देण्यासाठी माटुंग्याच्या रुईया कॉलेजने मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे. कॉलेजतर्फे ८ डिसेंबरला आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी धावपटू सज्ज झाले आहेत. फीच्या माध्यमातून जी काही रक्कम जमा होईल ती सारी रक्कम मानसिक आरोग्य विषयक जनजागृतीसाठी खर्च केली जाणार आहे. या मॅरेथॉनचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे. केवळ निरोगी शरीरासाठीच नव्हे तर ही धाव निरोगी निसर्ग आणि पर्यायानं निसर्ग रक्षणासाठी देखील आयोजित केली जाणार आहे. या निमित्तानं 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मी आहे पृथ्वीरक्षक' उपक्रमाचा संदेशही दिला जाणार आहे.

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायामाचं महत्त्व पटवून देत, मानसिक आरोग्य जपण्याचा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणा आहे. 'रन फॉर हेल्दी इंडिया' म्हणत अनेक धावपटू यात सहभाग नोंदवतील. स्पर्धकांच्या नोंदणीतून जमा झालेला निधी 'मानसिक अयोग्य जनजागृती'साठी खर्च होणार असल्यानं ही मॅरेथॉन मानसिक ताणतणाव आणि आजाराशी दोन हात करणारी ठरेल. ड्रीम रन प्रकारातील ५ किलोमीटरसाठी ही मॅरेथॉन आहे. यात कॉलेजचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, महिला, कर्मचारी वर्ग, इच्छुक मंडळी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही धाव सकाळी ७.३० ला रुईया कॉलेजपासून सुरू होणार असून डॉ. आंबेडकर मार्गाने पुढे जात वडाळा स्टेशन मार्गे पुन्हा कॉलेज जवळ येऊन संपेल. प्रत्येक स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक विभागातील पहिल्या तीन विजेत्यांना परितोषिकासह पदक देखील देण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog