इंटरनेट व्यसन सोडवण्यासाठी तरुणांचा 'उपवास' - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Tuesday, December 3, 2019

इंटरनेट व्यसन सोडवण्यासाठी तरुणांचा 'उपवास'


वजन कमी करण्यासाठी डाएट किंवा उपवास केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण आयटी प्रोफेशनल आता इंटरनेटपासून सुटका मिळवण्यासाठीही उपवास करायला लागले आहेत. संपद स्वेन हे वीकेंडला स्मार्टफोनवर नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम पाहायचे. पण त्यांनी आता सवयीत बदल केला आहे. अगोदर वीकेंडला दररोज १० तास मोबाईलवर घालवणारे संपद आता फक्त २ तास मोबाईलवर घालवतात. संपद हे पेमेंट्स आणि ई कॉमर्स स्टार्टअपचे को-फाऊंडर आहेत.
त्यांनी आता स्क्रीन टाईम अत्यंत वेगाने कमी केला आहे. वीकेंडला ते आता दिवसातून जास्तीत जास्त २ तास फोनवर घालवतात. संपद यांच्याप्रमाणेच अनेक आयटी प्रोफेशनल इंटरनेटपासून मुक्तीसाठी इंटरनेटचा ‘उपवास’ ठेवायला लागले आहेत. संपद यांनी याला डीटॉक्स नाव दिलं आहे. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. त्यामुळे संपद स्वेन सांगतात, ‘स्ट्रीमिंग माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनला होता. मी आता नेटफ्लिक्ससारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वेळ घालवण्यापेक्षा रिकाम्या वेळेत पुस्तकं वाचण्याची सवय लावली आहे. नव्या गोष्टी शिकण्याला डीटॉक्स म्हणतात.’ काय आहे सल्ला ?
  • फोनपासून जास्तीत जास्त दूर रहावं
  • स्क्रीन फ्री संडे नावाचा उपक्रम
  • इंटरनेट फास्टिंग म्हणजेच इंटरनेट उपवासाचा वापर
  • सुट्टीच्या दिवशी फोनचा वापर नाही
  • इंटरनेटचा वापर बंद करुन इतर गोष्टींचा अनुभव घ्या
निमहांसचे मानसोपचारतज्ञ मनोज कुमार शर्मा सांगतात, ‘इंटरनेट फास्टिंगचा निर्णय लोक स्वतःच घेतात, ज्यात ते इंटरनेटचा वापर करुन इतर गोष्टींचा अनुभव घेतात. गेमिंग किंवा स्ट्रीमिंगचं प्रचंड व्यसन असलेले लोक आमच्याकडे येतात, तेव्हा आम्ही त्यांना गेम खेळल्यानंतर थोडी विश्रांती घेण्याचा सल्ला देतो. यामुळे त्यांना मदत होते आणि विश्रांतीमुळे गेमपासून ते दूर जाण्यास मदत होते.’ दरम्यान, इंटरनेटचं व्यसन असलेल्या १० केस तरी आठवड्याला येतात, असंही मनोज कुमार सांगतात. मानसिक अस्वस्थता आणि या व्यसनामुळे डोळ्यांची समस्या, हात आणि थकवा येणे याही समस्या असतात, असं ते म्हणाले. निमहांसच्या २०१८ च्या अध्ययनानुसार, इंजिनीअरिंगच्या २७.१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ, ९.७ टक्के विद्यार्थ्यांमध्ये मध्यम आणि ०.४ टक्के विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटचं गंभीर व्यसन आहे. भाडेतत्वावरील घरात राहणारे विद्यार्थीही इंटरनेटचा जास्त वापर करतात. हे विद्यार्थी दररोज ३ तासांपेक्षा जास्त इंटरनेट वापरतात. या विद्यार्थ्यांना मानसिक समस्या जाणवतात.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog