केस गळतीवर देसी उपाय hair foll home remedy - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, December 13, 2019

केस गळतीवर देसी उपाय hair foll home remedyबदलेली जीवनशैली, आरोग्य, आहातील बदल, ताणतणाव आणि हवेतील प्रदूषण यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम हा होतोच. मात्र, याचा परिणाम केसांवर देखील होतो आणि त्यामुळे केस गळणे, केस तुटणे अशा अनेक समस्या निर्माण होतात, अशा जास्त गळणाऱ्या केसांवर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते. कारण केसगळतीचे प्रमाण वाढले तर ते विरळ होतात. चला तर जाणून घेऊया केस गळतीवर घरगुती उपाय

कांदा

कांदा हा केसांवर एक रामबाण उपाय आहे. केस गळत असल्यास कांदा बारीक चिरुन मिक्सरमधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ही पेस्ट पंधरा मिनिटे केसांना लावावी. यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते.


मेथी

मेथी रात्रभर पाण्यात भिजत घालावी. त्यानंतर सकाळी भिजलेली मेथी चांगली वाटून घ्यावी. ही वाटलेली पेस्ट केसांना लावून घ्यावी. त्यानंतर १ तासानंतर केस धुवावेत. हा उपयुक्त उपाय अनेक दिवस केल्यास गळतीचे प्रमाण कमी होते.

लसूण

लसणाच्या काही पाकळ्या ठेचून त्या खोबरेल तेलात घालून मिश्रण गरम करुन घ्यावे. लसूण मिसळलेले तेल थोडे थंड झाल्यावर केसांना लावावे. लसूणमध्येही केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असणाऱ्या सल्फर या घटकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केस गळतीवर चांगल्याप्रकारे फायदा होतो.

जास्वंद

केसांवर जास्वंदाची फुले एक चांगला रामबाण उपाय आहे. खोबऱ्याच्या तेलात जास्वंदाची सुकलेली फुले कुसकरुन ते तेल कोमट करुन केसांना लावावे. यामुळे केस गळती थांबते आणि केस वाढण्यास मदत होते.

कापूर

खोबऱ्याच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावणे उपयोगी ठरते. यासाठी केस धुण्याआधी एक तास हे कापूर मिसळलेले तेल केसांना लावावे. यामुळे चांगला फायदा होतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog