थायरॉइड आहे, काळजी नसावी का ? Have a thyroid, no worries? - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, December 13, 2019

थायरॉइड आहे, काळजी नसावी का ? Have a thyroid, no worries?हायपोथायरॉयडिसम म्हणजे थायरॉइड नावाच्या ग्रंथीतून स्रवणाऱ्या हार्मोनची पातळी कमी होणे. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड होतो असे मानले जाते. पण व्यतिरिक्तसुद्धा अनेक कारणं आहेत ज्यामुळे थायरॉइड बळावतो. गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या या ग्रंथीतून निघणारे हे हार्मोन शरीरातल्या सर्व पेशींचे कार्य सुरळीत रितीने चालणे आवश्यक असते. या हार्मोन्सच्या होणाऱ्या कमतरतेमुळे होणारा त्रास आणि त्यांची लक्षणं वेळेत समजली तर त्यावर उपाययोजना करणे शक्य असते. वेळेत लक्षणं ध्यानात आली तर थायरॉइड असणारा रूग्ण पुर्णतः बरा होऊ शकतो. त्यामुळे थायरॉइड असल्यास कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही.

जराशी काळजी आणि नियमित तपासणी हे दोन उपाय केल्यास थायरॉइडच्या विकारांमुळे होणारा त्रास टाळता येणे शक्य असते. हा त्रास विशेषतः महिलांना अधिक प्रमाणात होतो, असे देखील सांगितले जाते.


ही आहेत थायरॉइडची लक्षणे
थायरॉइड हॉर्मोन्सचे रक्तातील स्राव कमी झाल्यावर हा विकार उद्भवतो. वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे आदी प्रमुख लक्षणे या विकारात आढळून येतात. हा विकार शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटींग हॉर्मोन अर्थात टीएसएच तपासणी. हॉर्मोन थेरपी देऊन या विकारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच शरीराला कंप सुटणे, दरदरून घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे आणि थायरॉइड ग्रंथीची वाढ ही लक्षणे थायरॉइडची असू शकतात. या विकाराची पडताळणी करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या करण्यात येतात.

हे करा घरगुती उपाय
थायरॉइडची समस्या असल्यास आहारात दही आणि दूध जास्त प्रमाणात घ्यावे. यामुळे कॅल्शियम, मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे आरोग्य उत्तम राहते.
थायरॉइड कमी करण्यास आलं गुणकारी ठरतं. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम हे त्तत्व लाभदायक ठरतात. आल्यातील एंटी-इन्फ्लीमेंट्री हे गुण थायरॉइड वाढण्यापासून रोखतात.
थायरॉइड ग्रस्तांना थकवा जास्त जाणवतो. त्यामुळे ज्येष्ठमधाचे सेवन करणे लाभदायक ठरते. ज्येष्ठमधातील गुणकारी तत्व थायरॉइड ग्रंथीचं संतुलन बिघडू देत नाही.
गहू आणि ज्वारीचं सेवन केल्यास थायरॉइड ग्रंथी वाढण्यापासून रोखण्यासाठी फायदा होतो.
थायरॉइडग्रस्त व्यक्तीने नियमित फळं आणि भाज्या खाव्यात. तसेच नियमित व्यायामसुद्धा आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog