केसांमध्ये होणारा कोंडा - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, December 20, 2019

केसांमध्ये होणारा कोंडा


थंडीचे दिवस सुरु झाले की, अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. मग त्वचा कोरडी होणे असो किंवा ओठ फुटणे असो. यासोबतच थंडी सुरु झाली की महिलांना नाही तर पुरुषांनाही केसाबाबतीत सर्वात मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे केसांतील कोंडा. यामुळे केसांत खाज येणे, केस गळणे, केस पातळ होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. अशावेळी आपण नेमके काय करावे, हे आज आपण पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया केसातील कोंड्यावर घरगुती उपाय.

शहाळ्याचे पाणी

कोंड्यामुळे केसातील तेलकटपणा वाढत असेल तर केसांना तेलाऐवजी शहाळ्याचे पाणी लावावे. यामुळे केसांतील कोंडा दूर होईल आणि तुमचे केस मुलायम आणि बळकट होण्यास मदत होईल.

हे पण वाचा : - थायरॉइड आहे, काळजी नसावी का ? Have a thyroid, no worries?


दही

दही हे केसातील कोंड्यावर एक रामबाण उपाय आहे. आंघोळीच्या आधी ३० मिनिटे केसांना दही लावावे आणि चांगला मसाज करावा. यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते आणि केस देखील मऊ होतात.

लिंबाचा रस

केस धुतल्यानंतर थोड्या पाण्यात लिंबाचा रस टाकून त्या पाण्याने केस धुवावे. यामुळे केसातील तेलकटपणा, चिकटपणा आणि कोरडेपणा निघून जाईल जातो. त्याचबरोबर कोंडा देखील कमी होतो.

लसूण

लसणात अॅलेसेन म्हणून एक घटक आहे जो कोंड्यावर उपयुक्त ठरतो. याकरता लसणाची पाकळी कापून त्याचा रस करुन केसांच्या स्काल्पला लावला आणि १५ – २० मिनिटांनी केस धुऊन घ्यावेत. यामुळे केसातील कोंडा दूर होतो.

मेथीचे दाणे
हे पण वाचा : -  हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांचा किडणीवर काय परिणाम होतो ?
मेथीचे दाणे रात्री भिजत ठेवावे आणि सकाळी त्याची पेस्ट तयार करुन ते मिश्रण केसांना लावावे. यामुळे केसातील कोंडा दूर होतो.

टीप : घरगुती उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog