जेव्हा सलमानने सनी लिओनीला साडी नेसायला शिकवलं - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, December 27, 2019

जेव्हा सलमानने सनी लिओनीला साडी नेसायला शिकवलं


मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या 'दबंग ३' सिनेमामुळेच नाही तर बिग बॉस या त्याच्या रिअॅलिटी शोमुळेही चर्चेत आहे. तर बिग बॉसची माजी स्पर्धक सनी लिओनीही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे ती चर्चेत असते. आता सोशल मीडियावर सलमान आणि सनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सलमानने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये बस्तान बसवण्यासाठी मदत केली. एवढंच नाही अनेकांचं बुडत्या करिअरलाही त्याने हात दिला. पण सनी लिओनी ही एक अशी अभिनेत्री आहे जिची सलमानने चक्क साडी नेसण्यात मदत केली. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
जानेवारी २०१४ मध्ये स्टार गिल्ड पुरस्कारांच्यावेळी सलमानने सनीला साडी नेसायला शिकवलं होतं. यानंतर सनी म्हणाली होती की, 'माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखंच होतं.' सनी लिओनीने बिग बॉस ५ मध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. यावेळचा सनीचा पोल डान्स फार प्रसिद्ध झाला होता.
सलमानच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा दबंग ३ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने आतापर्यंत ९० कोटी रुपये कमावले आहेत. सिनेमात सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि किच्चा सुदीप यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

यानंतर पुढच्या वर्षी ईदला सलमानचा राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भारत सिनेमानंतर पुन्हा एकदा सलमान दिशा पाटनीची जोडी प्रेक्षकांना या सिनेमात दिसणार आहे. सलमान, दिशासोबत जॅकी श्रॉफ, रणदीप हुड्डा आणि सोहेल खानही या सिनेमात दिसणार आहेत.
Post Bottom Ad

LightBlog
loading...