घरात अस्वच्छता पाहून सलमानने घासले टॉयलेट - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, December 30, 2019

घरात अस्वच्छता पाहून सलमानने घासले टॉयलेट
मुंबई- या रिअॅलिटी शोमध्ये शनिवारी विकेण्ड का वॉरमध्ये सलमान खानऐवजी दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसला. सलमान न दिसल्यामुळे त्याच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली. यावेळी रोहितने घरातील सदस्यांना अनेक टास्क दिले. पण रविवारी सलमान बिग बॉसच्या घरात गेला. घरात गेल्यानंतर त्याने असं काही केलं की जे आतापर्यंत बिग बॉसच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं. सलमान घरात जाताना त्याच्यासोबत दोन टीम मेंबरही होते. यावेळी घरातील सर्व सदस्यांना बेडरूममध्ये बंद करण्यात येते. सर्वात आधी सलमान किचनमध्ये जाऊन स्वतः किचन स्वच्छ करतो. सलमान घरात काम करतोय हे पाहून घरातल्यांना धक्का बसतो. घरातले त्याला असं न करण्याची विनवणी करतात.

शिरुरमध्ये 11 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याच्यार

यानंतर सलमान फ्रीजमधले खराब झालेल्या भाज्या आणि इतर सामान काढून कचऱ्याच्या डब्यात टाकतो.यावर पारस बोलतो की, 'आम्ही तर फ्रिजकडे पाहिलंच नाही.' किचननंतर सलमान बाथरूमकडे जातो आणि चक्क बाथरूम साफ करायला लागतो. जेव्हा सलमान बाथरूमकडे जायला निघतो तेव्हा घरातले सर्व त्याला पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न करतात आणि सतत त्याची माफीही मागताना दिसतात. पण सलमान कोणाचंच ऐकत नाही. यानंतर सलमान घरातून बाहेर पडून पुन्हा एकदा होस्ट करायला लागतो. यानंतर आसिम सलमानची माफी मागतो. यावर सलमान त्याला म्हणतो की, 'कशाची माफी मागतोस? इथे कोणालाच लाज नाहीये. इथे प्रत्येकजण स्वतःला अतीशहाणा समजतो.' या आठवड्यात शहनाज घराची नवीन कॅप्टन झाली. तिच्या नेतृत्वाखाली घरातील अनेक सदस्य घरातील कामं नेमकी कोण करणार या संभ्रमात दिसले. यामुळे पूर्ण घर अस्वच्छ होतं. शेवटी सलमानने स्वतः येऊन घर साफ केलं.


महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान


Post Bottom Ad

LightBlog
loading...