पक्षाच्या नाही तर स्वत:च्या जवळच्यांना पदे एकनाथ खडसे, पंकजांपाठोपाठ प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Saturday, January 18, 2020

पक्षाच्या नाही तर स्वत:च्या जवळच्यांना पदे एकनाथ खडसे, पंकजांपाठोपाठ प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोलबीड :- भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंपाठोपाठ राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपा नेतृत्वावर टीकास्त्र सोडत नाराजी व्यक्त केल्यानंतर आता थेट पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जो आपल्या जवळचा आहे त्याला नव्हे तर पक्षाच्या जवळ आहे त्याला पद मिळायला हवे होते, असं वक्तव्य करत भाजपा
हे पण वाचा : - अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या '' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला
 नेतृत्वावर कटाक्ष टाकल्याने भाजपात पक्ष वाढवण्यापेक्षा स्वत:ला वाढवण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पंकजा मुडेंनी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा एकीकडे व्यक्त केली तसे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सत्तेत असताना आपल्या जवळच्याला अधिक महत्व दिले. त्यामुळेच भाजपावर अशी वेळ आल्याचे एकप्रकारे चंद्रकांत पाटलांनी मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली, अशी टीपणी केल्याचे बोलले जाते.
  हे पण वाचा : - स्टोरी लिमिटेड माणूस - की by Manoj Joshi

   कधीकाळी शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाजपात ‘मी तोच भाजप’ आल्यानंतर भाजपाची शिस्त बिघडली. त्यात सत्ता हातातून गेली, तेथून पुढे भाजपामध्ये अंतर्गत तूतू मैमै सुरू झाली. एकनाथ खडसेंना कायम डावलण्यात आल्याने खडसेंनी थेट पक्षनेतृत्व देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. त्यापाठोपाठ राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनीही फडणवीसांना लक्ष्य करत कोअर कमिटीचा राजीनामा देऊन प्रतिष्ठाणच्या माध्यमातून कामकाज करण्याचे सुतोवाच दिले. काल-परवा पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही पक्षाची संस्कृती बिघडल्याचे सांगत असून जो आपल्या जवळचा आहे त्याला अधिक महत्व दिले गेल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेल्या लोकांमुळे पक्षाची संस्कृती बिघडली अशी थेट कबुली देत चंद्रकांत पाटलांनी जो आपल्या जवळ आहे त्याला नव्हे तर जो पक्षाच्या जवळ आहे त्याला पद मिळायला पाहिजे, परंतु आता जो आपल्या जवळ आहे त्याला पद देण्याची पद्धत सुरू झाली आहे. हा माझा, तो माझ, तुझे काम करून देतो तिकडे जातो का, मग त्याच्याकडूनच तिकिट घे, तुला कसं तिकिट मिळत नाही पाहतोच, अशी संस्कृती भाजपात आल्यानंतर भाजपामध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे पाटील यांनी कबुल केले. हा सगळा रोख भाजप नेतृत्व फडणवीसांवर आहे का? यावर आता जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.

  हे पण वाचा : - केरुर निलंबन प्रकरणात पंकजा मुंडे, पल्लवी दराडे अडचणीत केरुर यांनी ‘वैद्यनाथ’चा परवाना केला होता रद्द,मंत्रीपदाच्या बळावर केरुर यांचं झालं होतं निलंबन

(रिपोर्टर)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog