बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Saturday, January 25, 2020

बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बीड जिल्ह्यात २२६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

मुंबई :-  महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले असतानाच शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढताच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महसूल विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये ४७ जास्त शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले आहे. २०१८ मध्ये २ हजार ७६१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली होती तर २०१९ मध्ये २ हजार ८०८ शेतकर्‍यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली.
हे पण वाचा : - बीड :- शहरातील फुलाईनगर भागाच्या हद्दीत असलेल्या काळे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये रात्री दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली


२०१५ पासून महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हळहळू कमी होताना दिसत होते. फडणवीस सरकारच्या काळात २०१५ मध्ये ३ हजार २२८ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या तर २०१६ मध्ये हा आकडा कमी होऊन ३ हजार ५२ वर आला. २०१७ मध्ये भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यावर्षी शेतकरी आत्महत्येची संख्या २ हजार ९१७ इतकी राहिली. २०१८ मध्येही हा आकडा २ हजार ७६१ पर्यंत खाली आला. मात्र, २०१९ मध्ये शेतकरी आत्महत्येची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.
हे पण वाचा : - शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली से-क्सची मागणी !


२०१९ हे वर्ष शेतकर्‍यांसाठी अनेक संकटांचे होते. मराठवाड्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले तर पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा तडाखा बसला. ४ लाख हेक्टरमधील शेती उद्ध्वस्त झाली. पावसाळा संपल्यानंतर राज्याच्या अनेक भागांना अवकाळीचे संकटही झेलावे लागले. त्यात राज्यभरात ९३ लाख हेक्टरवरील शेतीला फटका बसला. हेच कारण शेतकरी आत्महत्या वाढण्याच्या मूळाशी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. २०१९ मध्ये झालेल्या २ हजार ८०८ शेतकरी आत्महत्यांपैकी ४७ टक्के म्हणजेच १ हजार २८६ आत्महत्या एकट्या
हे पण वाचा : - महाराष्ट्रात मनसेचा ‘नवा झेंडा नवा अजेंडा’ शॅडो मंत्रीमंडळ
विदर्भात झाल्या आहेत. मराठवाड्यात ९३७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली तर उत्तर महाराष्ट्रात ४९१ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. महापुराचा फटका बसलेल्या पश्चिम महाराष्ट्रात ९३ आत्महत्या झाल्या तर कोकणात एका आत्महत्येची नोंद झाली. जिल्हानिहाय विचार केल्यास यवतमाळमध्ये सर्वाधिक २८६ तर त्याखालोखाल विदर्भातीलच बुलडाणा जिल्ह्यात २७१ शेतकरी आत्महत्या झाल्या. अमरावतीमध्ये २६५ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक २२६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली.
हे पण वाचा : -  पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog