'नवरी' झालेल्या कतरिना कैफचा फोटो - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Thursday, January 23, 2020

'नवरी' झालेल्या कतरिना कैफचा फोटो


      मोफत कानाची श्रवण तपसणी

           फोन. 0241-242-4344; 9657588677


मुंबई- अभिनेता विकी कौशलसोबत अफेअरच्या चर्चेनंतर आता अभिनेत्री कतरिना कैफ
नुकतीच नवरीच्या गेटअपमध्ये दिसली. याच वेशभूषेतील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विकीसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे चाहत्यांनी दिलं हे नाव

कतरिना आणि विकी कौशलच्या अफेअरच्या चर्चा सध्या बी- टाऊनमध्ये सर्वात जास्त चघळला जाणारा विषय आहे. पण अजूनपर्यंत दोघांनीही याबद्दल बोलणं टाळलं आहे. कतरिना आणि विकी दोघांनी त्यांच्या नात्यावर अधिकृत मोहर उमटवली नसली तरी त्यांचे चाहते मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. नुकतेच दोघं एका मित्राच्या पार्टीत एकत्र गेले होते. आता चाहत्यांनी ट्विटरवर त्यांना 'पॉवर कपल' या नावाने हाक मारायला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी एक निकनेमही शोधलं आहे. चाहत्यांनी विकी आणि कॅटसाठी 'VicKat' हे टोमणनाव शोधलं आहे.

जाहिरातीसाठी नवरी झाली कतरिना-
सध्या सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत ते एका जाहिरातीसाठी कतरिनाने केलेला लुक आहे. स्वतः कतरिनानेही तिच्या इन्स्टाग्रामवर या लुकमधले काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ती सेटवर बोर्ड गेम खेळताना दिसत आहे. गेम खेळताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. आता कतरिना लग्न कधी करेल हे तर सांगता येणार नाही पण ती नवरीच्या गेटअपमध्ये खूप सुंदर दिसते यात काही शंका नाही.

Post Bottom Ad

LightBlog
loading...