विद्याच्या साडीचे किस्से; अशी लढवली शक्कल की नातेवाईकही होतात खूश - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Wednesday, January 1, 2020

विद्याच्या साडीचे किस्से; अशी लढवली शक्कल की नातेवाईकही होतात खूश


बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे साडी या पारंपारिक पोशाखावर असलेले प्रेम सर्वज्ञात आहे. विद्या केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसण्यास प्राधान्य देते. त्याचप्रमाणे भारतातील स्त्रियांनी साडीला प्राधान्य द्यावे, असे विद्याचे म्हणणे आहे. विद्या दररोज विविध प्रकारच्या साड्या नेसते. तसेच एकदा वापरलेली साडी पुन्हा कधीही वापरत नाही. तर मग इतक्या साड्यांचे विद्या करते तरी काय?


विद्या एका वर्षात जवळपास ३०० हून अधिक साड्या खरेदी करते. त्यामुळे एकदा वापरलेल्या महागड्या साड्या ती आपले नातेवाईक, मित्रमंडळी व घरात काम करणाऱ्या नोकर मंडळींना भेट स्वरुपात देते. तसेच अनेकदा कार्यक्रमांमध्ये जाताना फुलांचा गुच्छ किंवा अन्य एखादे गिफ्ट देण्यापेक्षा ती आपल्या महागड्या साड्याच देणे जास्त पसंत करते. यामुळे साड्या घरात पडून राहात नाहीत. तसेच अनोखी भेटवस्तू दिल्यामुळे तिच्या मैत्रीणीही खूश होतात. असे विद्याने दोन वर्षांपूर्वी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सांगितले होते.
दरम्यान अलिकडेच विद्याने ‘वाया’ या साड्यांच्या कलेक्शनचे अनावरण केले. गौरांग शाह, बाप्पादित्य आणि मीरा सागर या डिझाइनर्सनी ‘वाया’ हा ब्रॅण्ड सुरु केला आहे. आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि पारंपारिकता या दोन गोष्टींची योग्य जोडणी करुन तयार करण्यात आलेल्या या साड्यांची विद्याने प्रशंसा केली.

Post Bottom Ad

LightBlog
loading...