आता Galaxy A50s च्या किमती झाल्या कमी - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, February 7, 2020

आता Galaxy A50s च्या किमती झाल्या कमीजर तुम्ही 20 हजाराहून कमी किंमतीत नवीन सॅमसंगचा फोन घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सॅमसंगने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी A50s च्या किंमतीत किमती कमी  केली आहे. कंपनीकडून या फोनच्या किंमतीत 5500 रुपयांची कमी  करण्यात आली आहे.Samsung Galaxy A50s future  –
सॅमसंग गॅलेक्सी A50s स्मार्टफोनमध्ये 6.4 इंच फुल HD+ इन्फिनिटी-यू सुपर ऐमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. अँड्रॉइड 9.0 पायवर काम करणारा हा फोन सॅमसंग Exynos 9611 प्रोसेसरसोबत येतो. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमच्या दोन पर्याय आहेत. दोन्ही व्हेरिअंट 128 जीबी स्टोरेजसह येतात. या फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. त्यासोबत 8 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे दोन अन्य कॅमेरे आहेत. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन
प्रिझम क्रश ब्लॅक, प्रिझम क्रश व्हाइट आणि प्रिझम क्रश व्हायलेट (Violet) अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.New Price  – किंमतीत झालेल्या कमी  नंतर हा फोन आता (4 जीबी रॅम व्हेरिअंट) 17 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. आधी या व्हेरिअंटची किंमत 22 हजार 999 रुपये होती. याशिवाय 6 जीबी रॅम व्हेरिअंट 19 हजार 999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. लाँचिंगवेळी या मॉडेलची किंमत 24 हजार 999 रुपये होती. फोनची नवी किंमत अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केला होता.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog