Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी या मंत्र्यांनी केली आहे.


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Ministers security) यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे. (Ministers security)
हे पण वाचा :- एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एअरटेल आता ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन देणार (Airtel stop free service) नाही.


दाभोळकर, पानसरे यांची हत्या झाल्यानंतर धोका असल्याचा दावा जितेंद्र आव्हांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
गेल्या वर्षी जानेवारी 2019 मध्ये फडणवीस सरकारने जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था काढली होती. निवडणुकीच्या कारणामुळे आधी सुरक्षा काढली होती. ठाणे पोलीस दलाकडून आव्हाडांना सुरक्षा दिली जात होती. त्याआधी 2018 मध्येही आव्हाडांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र आव्हाड हे सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर असल्याचं गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट करुनही तत्कालिन भाजप सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने फडणवीस सरकारवर केला होता.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीला पळविले शिवाजीनगर ठाण्यात
दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत-पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हे पण वाचा :- करोना: महाराष्ट्रातील दोघांचा चीनमधून येण्यास नकार