सावधान Real me मोबाइल घेताय तर - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Friday, February 7, 2020

सावधान Real me मोबाइल घेताय तर


स्मार्टफोन बनविणाऱ्या Realme कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इशारा दिला असून कंपनीच्या खोट्या संकेतस्थळाबाबत सतर्क केलं आहे. कोणीतरी फसवणुकीच्या उद्देशाने www.realmepartner.in नावाने संकेतस्थळ सुरू केल्याचे कंपनीने सांगितले. हे संकेतस्थळ रिअलमीद्वारे हाताळले जात नाही असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.“याबाबत समजल्यावर आम्हाला आश्चर्य वाटलं. आमच्या नावाने लोकं फेक वेबसाइट बनवतायेत हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आमचे केवळ www.realme.com हेच एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे. आमचे ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांनी खोट्या संकेतस्थळापासून सावध राहावं”, अशी प्रतिक्रिया रिअलमी इंडियाचे CEO माधव सेठ यांनी दिलीये. फेक वेबसाइटवर काही लोकं रिअलमीचे बनावट उपकरणं विकत आहेत. यामध्ये रिअलमी बड्स, कनेक्टर आणि वायर यांसारख्या उपकरणांचा समावेश आहे. याप्रकरणी कंपनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं माधव सेठ यांनी स्पष्ट केलंय. कंपनीचे सर्व प्रोडक्ट्स अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, तिथूनच खरेदी करावं असं आवाहनही सेठी यांनी केलं आहे.यापूर्वी शाओमीच्या नावानेही एक फेक वेबसाइट बनवून लोकांची फसवणूक केली जात होती. शाओमीच्या नावाने सुरू झालेल्या फेक वेबसाइटची माहिती गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी दिली होती.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog