काम लवकर पूर्ण करण्याची व्यक्त केली अपेक्षा , सहकार्य करण्याचे दिले आश्वासन - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Wednesday, February 5, 2020

काम लवकर पूर्ण करण्याची व्यक्त केली अपेक्षा , सहकार्य करण्याचे दिले आश्वासन


शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे  आमदार विनायक मेटें यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी याबद्दलची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.आवश्यकता असल्यास मी सदैव सहकार्य करेल असेही मेटेंनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे  मेटे २०१५ पासून समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते.
हे पण वाचा :- करोना: महाराष्ट्रातील दोघांचा चीनमधून येण्यास नकार


छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदी विनायक मेटेंची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानं मेटेंनी राजीनामा दिला आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीला पळविले शिवाजीनगर ठाण्यात
 तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. कृपया आपण राजीनामा स्विकारावा ही विनंती,' असं मेटेंनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  हे पण वाचा :   चौदा लाखांचा गुटखा जप्त; केजमध्ये गुटख्याच्या गोडाऊनवर छापा
'आपल्या नेतृत्वाखाली महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा व्यक्त करत असतानाच या कार्यक्रमासाठी माझी काही आवश्यकता भविष्यामध्ये लागल्यास माझे सहकार्य हे सदैव राहील,' असे विनायक मेटे यांनी पत्रात नमूद केलं आहे.No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

LightBlog