जॅकी श्रॉफ यांचा खुलासा : माझ्या मुलाचं नाव टायगर हे खरं नाही - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Thursday, February 6, 2020

जॅकी श्रॉफ यांचा खुलासा : माझ्या मुलाचं नाव टायगर हे खरं नाहीहे पण वाचा :- 'नाईट लाईफ म्हणजे काय?' आर्चीला सांगितलेलंच कळलं नाही

ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आज ६३ वा वाढदिवस. आपली भाषा आणि बोलण्याच्या लहेजामुळे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळी ओळख मिळणारे जॅकी श्रॉफ आजही नेटकऱ्यांमध्ये ‘आपना भिडू’ नावाने लोकप्रिय आहेत. चार दशकांपासून मनोरंजन सृष्टीत असणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनी २२० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जॅकी हे आपल्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा ते पत्रकारांचा आणि मित्रांचा उल्लेख ‘भिडू’ असा करतात. मात्र त्यांच्या मुलगा म्हणजेच अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नावाबद्दलही अनेकदा त्यांना मुलाखतीमध्ये विचारलं जातं. आपल्या मुलाचे नाव टायगर ठेवण्यामागील कारण त्यांनी अशाच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

टायगरचे खरे नाव वेगळचं

अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या अॅक्शनपॅक्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो. मात्र त्याच्या नावाची अनेकदा चर्चा होताना दिसते. पण हे नाव त्याला कसे पडले याबद्दल त्याचे वडील म्हणजेच जॅकी श्रॉफ यांनी खुलासा केला होता. मुळात टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे.टायगर नावामागील कहाणी काय?

पण मग जयला टायगर नाव कसे पडले याबद्दल जॅकी म्हणतात, “जय लहान होता तेव्हा तो सर्वांचा चावा घ्यायचा. त्यामुळेच मी त्याला लाडाने माझा टायगर असं म्हणायचो. त्यातूनच पुढे त्याला मी टायगर म्हणून लागलो आणि तेच नाव त्याची ओळख बनलं.” मात्र आता संपूर्ण जग जॅकी यांच्या मुलाला टायगर नावाने ओळखत असतानाच त्यांनी आता टायगरला वेगळचं नाव दिलं आहे. ‘माझे वडील मला नेहमी भीडू किंवा मेरा बच्चा अशा नावाने आवाज देतात. त्यांना हे दोन्ही शब्द फार आवडतात,’ असं टायगरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

टायगरला कधीच त्यासंदर्भात सल्ला देत नाही

“टायगरने कोणते चित्रपट निवडावेत किंवा कसा अभिनय करावा याबद्दल मी त्याला कधीच सल्ला देत नाही,” असं जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. “चित्रपटामधील टायगरचे अॅक्शन सिन्स पाहिल्यावर मी त्याच्याशी चर्चा करतो आणि काय आवडले काय खटले हे सांगतो,” असं जॅकी म्हणाले होते.Post Bottom Ad

LightBlog
loading...