धुळे आणि पालघरमध्ये करोनाचे दोन रुग्ण सापडले - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, April 20, 2020

धुळे आणि पालघरमध्ये करोनाचे दोन रुग्ण सापडलेधुळे: धुळे आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. धुळ्यात एका व्यक्तीला तर पालघरमध्ये एका महिलेला करोनाची लागण झाली असून दोघांवर तातडीने उपचार करण्यात येत आहे. धुळ्यात तिरंगा चौक परिसरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्याला ८ ते १० दिवसांपासून सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता. 
औरंगाबाद: हुश्श... 'त्या' महिलेच्या बाळाला करोना नाही
त्यामुळे त्याला हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्ये आज रिपोर्ट आले असता त्याला करोना झाल्याचं स्पष्ट झाल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितलं. हा करोना रुग्ण कुणाच्या संपर्कात आला होता का? याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या आधी धुळ्याच्या साक्रीमध्ये एक करोना रुग्ण आढळून आला होता.
सांगलीत एकाला करोना; रुग्णांची संख्या २७वर
तर मालेगाव येथील एका महिलेवरही धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. या दोघांचाही मृत्यू झाल्याने धुळ्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सारणी येतील कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २४ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. तिच्याही संपर्कातील लोकांचा तपास घेण्यात येत असून तिच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच ही महिला राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, कासा रुग्णालयातील दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील १५० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं.


वाचा:

Post Bottom Ad

LightBlog
loading...