अपघातातील रुग्णांना झोपविलं खाली; व्हिडीओ व्हायरल - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Saturday, June 6, 2020

अपघातातील रुग्णांना झोपविलं खाली; व्हिडीओ व्हायरल


बीड जिल्हा रुग्णालयातील अनेक प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातातील दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. 

तरुणावर नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं मात्र या रुग्णावर कसलाच उपचार झाला नाही, शिवाय रुग्णांना बेडवर नाही तर चक्क जमिनीवर झोपू घातलं.

दोन्ही रुग्ण अक्षरशा तडफडत होते तरीदेखील एकही डॉक्टर किंवा कर्मचारी या रुग्णांच्या मदतीला धावून आला नाही. घटना गुरुवारी रात्रीची आहे. रुग्ण तडफडत असतानाचा एक व्हिडीओ सोशल माध्यमावर चांगलाच वायरल होतय. दोघांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते तिथे उपचार सुरू असताना या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. 

गणेश देशमुख आणि सचिन भोसले असं त्यांचं नाव असून दोघे जणही माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रहिवासी आहे. यावर मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासन बोलण्यास नकार दिला आहे.

Post Bottom Ad

LightBlog
loading...