🧐 शहरात 11 जण पॉझिटिव्ह - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, June 1, 2020

🧐 शहरात 11 जण पॉझिटिव्ह


पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, भाटनगर, रुपीनगर, पिंपरी, बौध्दनगर, वाल्हेकरवाडी, दत्तनगर या भागातील आहेत. तर आनंदनगर, दिघी, खडकी, ताडीवाला रोड, आंबेगाव येथील रहिवासी असलेल्या 13 जणांना घरी सोडण्यात आले आहे. याचा अहवाल रविवारी (दि.31) रोजी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत शहरातील कोणताही भाग नव्याने सील करण्यात आलेला नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. यामुळे शहरात रविवारी सायंकाळपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 522 वर पोहोचला आहे. आजवर शहरातील 8 तर शहराबाहेरील 12 रुग्णांचा पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला आहे.
शहरातील 262 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 220 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 32 जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. शहराच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या परंतु शहरात उपचार घेतलेल्या 34 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

Post Bottom Ad

LightBlog
loading...