💁‍♂️ पुरलेला मृतदेह काढला बाहेर - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Saturday, June 6, 2020

💁‍♂️ पुरलेला मृतदेह काढला बाहेर

 
नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी करणे सासूच्या जीवावर बेतले, संतापलेल्या जावयाने ट्रॅक्टर खाली चिरडून सासूचा खून करीत तिचा मृतदेह शेतात पुरून टाकल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे, या प्रकरणात तब्बल 14 दिवसानंतर पोलिसांनी पुरलेला मृतदेह ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथे एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर नेकनूर येथील मांडवखेल येथे पती-पत्नीच्या भांडणात सासूने मध्यस्थी केल्याच्या रागातून जावयानं सासूची हत्या केली आहे.

जावयानं सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा निर्घृण खून केला आहे. एवढंच नाही तर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. हा धक्कादायक प्रकार 13 दिवसानंतर उघडकीस आला आहे.

पहिली खुनाची घटना अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथे घडली आहे. सोपान मुसळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोपान यांचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. बरदापूर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. असून खुनाचं कारण अद्याप समजू शकले नाही.

दुसरी घटना नेकनूर येथील मांडवखेल येथे घडली आहे. एकाने त्याच्या सासूच्या अंगावर टॅक्टर घालून तिची हत्या केली आहे. पती पत्नीच्या भांडणात सासूने मध्यस्थी केल्याच्या रागातून जावयाने सासूला ट्रॅक्टरनं चिरडलं. एवढंच नाही तर तिचा मृतदेह परस्पर पुरला. मात्र, तब्बल 13 दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी सचिन कदमसह त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुलीकडे आलेली महिला बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. तपास करताना संशयित म्हणून महिलेचा जावई सचिन तुकाराम कदम व त्याचे वडील तुकाराम कदम यांना नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी खुन केल्याची कबुली दिली.

Post Bottom Ad

LightBlog
loading...