धनगरवाडी (पिंपळा) येथील कन्टेनमेंट झोन शिथील - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Saturday, June 6, 2020

धनगरवाडी (पिंपळा) येथील कन्टेनमेंट झोन शिथील


धनगरवाडी (पिंपळा) ता.आष्टी  येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती. येथील शासनाचे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

धनगरवाडी (पिंपळा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यामूळे सदरील गावे व परिसरात अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3)अन्वये पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली होती. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही, असे कळविले आहे. 

यामुळे धनगरवाडी (पिंपळा) या गावापासून 3 किं.मी.धनगरवाडी (पिंपळा), पिपंळा, नांदूर , खरडगव्हाण व सोलापूरवाडी या परिसरातील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत. 

जिल्ह्यात दि. ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Post Bottom Ad

LightBlog
loading...