नातेवाईकांना क्वारंटाइन केल्याने महिला सरपंचाला मारहाण! - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Saturday, June 6, 2020

नातेवाईकांना क्वारंटाइन केल्याने महिला सरपंचाला मारहाण!अहमदनगर :
 भावकीतील लोकांना केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये युवराज पांडुरंग आखाडे व बाळासाहेब रामा वाघमारे (दोघे रा.चिंचोली काळदाता, कर्जत) या दोघांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात यासाठी समितीही स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये गावच्या सरपंचाचा सुद्धा समावेश आहे. मात्र, ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करताना वाद उद्भवू लागले असून मारहाणीचे प्रकारही घडू लागले आहेत. कर्जत पोलिस स्टेशनला देखील असाच एक गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील महिला सरपंच व त्यांच्या पतीला दोन जणांनी भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे मारहाण केली आहे. शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास संबंधित महिला सरपंच या स्वतःच्या घरातून सांडपाणी बाहेर टाकण्यासाठी आलेल्या असताना आरोपी युवराज आखाडे व बाळासाहेब वाघमारे तेथे आले व ‘तू जाणीवपूर्वक आमच्या भावकीतील लोकांना मिरजगाव येथे क्वारंटाइन केले आहे,’ असे सरपंचाला म्हणाले. यावेळी ‘करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारचे तसेच आदेश आहेत,’ असे सरपंच यांनी आखाडे व वाघमारे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवराज आखाडे व बाळासाहेब वाघमारे यांनी संबंधित महिला सरपंचाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेचा पती सोडवण्यासाठी मध्ये गेला असता, त्यालाही आरोपींनी मारहाण केली आहे. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Post Bottom Ad

LightBlog
loading...