Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग' असे म्हणणार नाही!

photo-76646053
धुळे: ' यांनी माझा विश्वासघात केला पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस ''महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे'', असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी तसे कधी बोलणार नाही', असं खळबळजनक विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व भाजपचे माजी आमदार यांनी भाजपचे विधान परिषद सदस्य यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ( targets ) गोपीचंद पडळकर यांना सावध करतानाच गोटे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राजकारणावर बेफामपणे टीकास्त्र सोडले आहे. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. 'फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस ''महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे'' असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी तसे कधी बोलणार नाही. फडणवीस रोज रात्री १० नंतर वर्षा बंगल्यावर सार्वजनिक किंमत नसलेल्या चरित्रहीन लोकांना घेऊन बसायचे. आपल्याच पक्षातील नेत्यांविरुद्ध ते कारस्थानं करायचे. हे काही सुसंस्कृतपणाचे, सभ्यतेचे, मनाच्या दिलदारपणाचे लक्षण नाही', अशा शब्दांत गोटे यांनी फडणवीसांना लक्ष्य केले. 'एकही धनगर विधानसभेत निवडून येऊ नये यासाठी त्यांनी कारस्थाने केली. प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग केले. हे सारे मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात तर 'मुसलमान निवडून आली तरी चालेल पण अनिल गोटे निवडून येता नये', यासाठी फडणवीसांनी पैशांचा महापूर आणला होता, असा आरोप गोटे यांनी केला.