🚬 व्यसनमुक्त होण्यासाठी Lockdown चा काळ उत्तम; करा ‘हे’ घरगुती उपाय - BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS | I LOVE BEED

BEED NEWS , JOBS NOKARI, HELTH CARE, SELFCARE, LIFESTYLE

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

LightBlog

Monday, June 1, 2020

🚬 व्यसनमुक्त होण्यासाठी Lockdown चा काळ उत्तम; करा ‘हे’ घरगुती उपाय


💁‍♂️दारू व सिगारेट सोडण्याचे सहज-सोपे घरगुती उपाय

👉१. तंबाखूचे व्यसन सोडायचे असल्यास शुगरलेस गम चावून खा. गाजर, मुळा, काकडी अशा कुरकुरीत भाज्या खा.

👉२. गाजराचा रस नियमित प्यायल्यास दारूचे व्यसन सोडता येऊ शकते.

👉३.धुम्रपान किंवा मद्यपान हे व्यसन सोडण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करा.

👉४. धुम्रपानाकडे दुर्लक्ष करा –
दारू किंवा सिगारेट सेवनाची इच्छा झाल्यास ती टाळण्यासाठी स्वतःचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अन्य कुठल्या तरी कामात व्यस्त करून घ्या. घरात धुम्रपानरहित झोन तयार करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय जुनी गाणी ऐका, मित्रांशी सोशल मीडियाच्या माध्यातून संवाद साधा, चित्र काढा, पुस्तक वाचणे किंवा बागकाम करणे, अशा कामांमध्ये स्वतः रमवून घ्या. यामुळे तुमचे मन आनंदी व प्रसन्न राहिल.

👉५. व्यसन करणाऱ्या मित्रांपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.

👉६. धूम्रपान निवारण थेरपी –
धुम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घेऊ शकता. याशिवाय आपण स्वतःचे समुपदेशन देखील करू शकता.व्यसनमुक्तीसाठी तंबाखू सोडलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत घेण्याचाही प्रयत्न करा. यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.

👉७. व्यसन न करण्याची सवय लावा –
इच्छाशक्ती असल्यास कुठल्याही व्यसनापासून दूर राहता येऊ शकतं. यासाठी सुरूवातीला एखाद्या व्यक्तीने ठरवले की, आपणं सलग तीन दिवस व्यसन करणार नाही. त्यानंतर आणखीन सहा दिवस असे जवळपास महिनाभर व्यसन न केल्यास संबंधित व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. कालांतराने हळुहळू ही व्यक्ती व्यसनापासून दूर जाते.

👉८. मानसिकतेचा सराव करा –
व्यसन सोडवण्यासाठी व्यक्तीचे मन स्थिर असणे गरजेचे आहे. यासाठी नियमित ध्यान, योगा करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.

👉९. दररोज व्यायाम करा –
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. यात चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. परंतु, अन्य व्यायाम प्रकार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे गरजेचं आहे.

👉१०. मानसिक स्वास्थ राखण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या –
मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सकांचे समुपदेशन करणारे मानसिक आरोग्य व्यावसायिक आपल्याला आपला ताण कमी करण्यास निश्चितपणे मदत करतील आणि परिस्थितीशी सामोरे जाण्यास मदत करतील.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

Post Bottom Ad

LightBlog
loading...